लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुलींच्या शिक्षणात खंड पडून नये यासाठी दरवर्षी ग्रामीण भागातील विद्याथीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षात ४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप करण्यात आल्या आहेत.मोफत बसपासेस वाटप करण्यात आल्याने जिल्ह्यातील औंढा, हिंगोली व सेनगाव एकूण तीन तालुक्यातील विद्यार्थिनींना बस सुविधेचा लाभ मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यानी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शासनाकडून दरवर्षी पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तर आठवी ते बारावीतील विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. पूर्वी दर तीन महिन्याला पास नूतनीकरण करून घेणे अनिवार्य होते. परंतु आता मागील एका वर्षांपासून मुलींना थेट सहामाही पास वाटप करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासासाठी दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पासेस दिल्या जात आहेत. ज्या मुलींना बसपास मिळाली नाही त्यांनी तात्काळ आगारातील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले.तालुकानिहाय बस वाटपची संख्या४हिंगोली आगारातर्फे मानविकास योजने आठवी ते बारावीतील ३४६ मुलींना तसेच पाचवी ते दहावीतील ९९३ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इतर १३५ मोफत बसपास वाटप केल्या. सेनगाव येथे मानव विकास योजनेच्या ३५० तर अहिल्याबाई होळकर योजनेच्या १४००, व इतर १३० तसेच औंढानागनाथ येथे मानव विकास योजनेच्या ४०० तर अहिल्याबाई होळकर योजनेच्या ९७० व इतर १४० अशाप्रकारे शालेय मुलींना बसपासेस वाटप करण्यात आल्याची माहिती हिंगोली आगाराचे पुंडगे यांनी दिली.
४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:02 AM