लोकमत न्यूज नेटवर्कऔढा नागनाथ: तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.औढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गतवर्षी केवळ १५ ते २० गावांमध्येच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले होते. त्या पटीत यंदा १०१ पैकी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. फेब्रुवारीतच तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईला सुरुवात झाली. परंतु तहसिलदार पांडुरंग माचेवाड व गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सुमारे ५४ गावांत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिग्रहण व टँकर सुरू केले आहेत. याचबरोबर त्यांनीइतर अडचणी जाणून घेतल्या आहेत. पंचायत समितीच्या वतीने अधिग्रहणासाठी तहसीलदारांकडे ७५ गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी देवळा तुर्क, प्रिंपी, कंजारा, देववाडी, देवाळा, लक्ष्मणनाईक तांडा, गांगलवाडी, उंडेगाव, सावळी तांडा, काशीतांडा, पांग्रा, लाख, दुधाळा, पूर, वडद, अंजनवाडा, मु. सावंगी, टाकळखोपा, काठोडा तांडा, सिध्देश्वर तांडा, रूपूर तांडा, हिवर खेडा, सेंदूरसना, रूपूर, लांडाळा, येळी अंजनवाडा तांडा, लाख, हिवरा, जाटू, भोसी, असोला तर्फे लाख, असोंदा, पिंपळा यासह ४५ गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहीर व बोअर अधिग्रहण करण्यात आले.पाऊस जरी पडला तरी पिण्याचा पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. हा प्रश्न तत्काळ सुटणे अवघड असल्याने या गावांमध्ये शासनाच्या धोरणानुसार ३० जूनपर्यंत अधिग्रहण आणि पाण्याचे टँकर राहणार आहे. अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या भेटी देण्याचे काम सुरू असून गरज पडल्यास अधिग्रहण व टँकरसंख्यावाढवण्यात येणार असल्याचे बीडीओ ठोंबरे यांनी सांगितले. केळी, सावळी तांडा, धारखेडा, चिंचोली, निळोबा, देवसडी, जलालपूर, तपोवन, संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळा पाणी तांडा, सेवादास तांडा या पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यावर्षी तब्बल ७५ गावांनी अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. ही सर्व अधिग्रहण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच मंजूर केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:36 PM