शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

जिल्ह्यातील ४५६२ कुटुंबांना ‘सौभाग्य’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:52 AM

जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला २०१७ रोजी प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत केवळ शहरातच नव्हे, तर दुर्गम व अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्यांना वीजजोडणी दिली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य'च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटुंबांना २०१८ अखेरपर्यंत वीज जोडणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने सध्या जिल्ह्यात सौभाग्य योजनेचा गरजू कुटुंबियांना लाभ दिला जात आहे. सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरिबांच्या घरा-घरात वीजजोडणी देण्याचा संकल्प आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ करण्याचा शासनाचा दृष्टिकोण आहे. योजनेअंतर्गत घरा-घरात वीज पोहचविणे हा उद्देश आहे. सौभाग्यच्या माध्यमातून महावितरण नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या १० हजार ६०४ कुटुंबांना ११ दिवसांत वीजजोडणी दिली.या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिन पॉर्इंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीज जोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे. नांदेड जिल्ह्यातील वीज जोडणीपासून वंचीत २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी २ हजार ३५३ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्याातील ९ हजार ३२५ पैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणGovernmentसरकार