शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

गारपीटग्रस्तांसाठी ४.७ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:13 AM

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.यंदा रबीच्या काढणीच्या हंगामातच गारपिटीने हल्लाबोल केल्याने शेतकºयांचे या पिकांसह फळबागा, भाजीपाला आदीचे नुकसान झाले आहे. यात ३३ ते ५0 टक्के नुकसान झालेले कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यात जिरायतीचे एकूण ५0१६ शेतकºयांचे क्षेत्र ३२९४ हेक्टरवर नुकसान असून २.२४ कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी १३२ हे., तूर ३.३, हरभरा-८0२.८ हेक्टर तर इतर २३५६ हेक्टर क्षेत्र आहे. फळपिके सोडून इतर बागायती पिकांसाठी हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यातील ३३७३ शेतकºयांच्या १२६९ हेक्टरसाठी १.७१ कोटींचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात भाजीपाला १0३ हेक्टर, गहू ११४२ हेक्टर, कांदा ४.६ हेक्टर, केळी-२.६ तर करडई १७ हेक्टर आहे. कळमनुरी व हिंगोलीत ४६ शेतकºयांच्या २९ हेक्टर फळबागांसाठी ५.३२ लाखांचा प्रस्ताव आहे. यात पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा, लिंबोनीचा समावेश आहे.८0६ हेक्टरचे ५0 टक्क्यांवर नुकसानजिल्ह्यात ८0६ हेक्टरवर ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती पिकांमध्ये १0७७ शेतकºयांचा ६३७ हेक्टरचे ४३.३६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी-९२.२९ हेक्टर, हरभरा ५३७ हेक्टर व इतर ८.५ हेक्टरचा समावेश आहे. फळपिके सोडून बागायतीचे ५८६ शेतकºयांचे १५७ हेक्टरचे नुकसान झाले असून २१.२६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात कळमनुरी व वसमत तालुक्यात भाजीपाला ६.२ हेक्टर, गहू १४१ हेक्टर, केळी १.२ हेक्टर आहे. तर फळबागांचे कळमनुरी व वसमत तालुक्यातील २९ शेतकºयाचे ११.२ हेक्टरच्या नुकसानीस २ लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे.५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या १२५९ आहे. त्यात जिरायतीस ६८00, बागायतीस १३५00 तर फळपिकांस १८000 याप्रमाणे प्रस्ताव पाठविला. कळमनुरीत ४९.५५ तर वसमतला १७.१0 लाखांच्या भरपाईचा हा प्रस्ताव आहे.३३ ते ५0 टक्क्यांमध्ये ८१६६ शेतकºयांचे ४५९३ हेक्टर क्षेत्र असून त्याच निकषाप्रमाणे भरपाईचा हिंगोली १.३७ कोटी, कळमनुरी-२.३४ कोटी, सेनगाव २२.११ लाख, वसमतचा ५.९९ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.