लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात महिला व बालविकास खात्याच्या सहा प्रकल्प कार्यालयांतर्गत १0७९ अंगणवाड्यांतील बालकांची वजन तपासणी केली होती. यात ४७३ बालकांचे वजन वय व उंचीच्या प्रमाणात आढळले नाही. या कुपोषित बालकांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ५0 लाखांचा निधी दिला असून यातून या बालकांना अतिरिक्त पोषण आहार, वैद्यकीय सेवा आदीसाठी प्रतिदिन २५ रुपये याप्रमाणे दोन महिन्यांचे दीड हजार रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. पूर्वी एकच महिना बालक बालविकास केंद्रात असायचा. तर त्याला केवळ १२५0 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र यंदा दोन महिने ठेवले जाणार आहे. यामध्ये कळमनुरी प्रकल्पात १४ बालविकास केंद्रात २३ बालके, हिंगोलीत ३५ केंद्रांमध्ये ६१, वसमतला ८५ केंद्रांमध्ये १३४, सेनगावात ३४ केंद्रांमध्ये ९३, औंढा नागनाथला ६७ केंद्रांमध्ये १२९, आखाडा बाळापूर अंतर्गत १६ केेंद्रांमध्ये ३३ बालकांचा समावेश आहे. जवळच्या अंगणवाडीतील बालकांना एकत्रित करून एक बालविकास केंद्र स्थापन केलेले आहे.या बालकांना दिवसातून आठवेळा आहार मिळण्याची काळजी घेतली जात आहे. यात अंगणवाडी सेविका दोनदा अमायलेजयुक्त पीठाचा आहार देत आहेत. तर दोन वेळा घरचे जेवण घ्यायचे आहे. तर इतर चार वेळा अंडी व केळी आहारात द्यायची आहेत.कमी कुपोषित : १00२ बालकेकमी कुपोषित बालकांची संख्या जिल्ह्यात १00२ आहे. त्यांना अतिरिक्त आहार देऊन कुपोषणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मुले बालविकास केंद्रात दाखल करणे बंधनकारक नाही. केवळ त्यांना अंगणवाडी सेविकांच्या देखरेखीत आहार दिला जात आहे. यामध्ये प्रकल्पनिहायकळमनुरी-८५, हिंगोली-९६, वसमतगल११, सेनगाव-२८७, औंढा नागनाथ-१३७ तर आखाडा बाळापूर ८६ अशी कमी कुपोषित बालकांची संख्या आहे. वसमत या सधन तालुक्यातच कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसत असल्याने ही बाब चिंतेचा विषय आहे.बालविकास केंद्रात दाखल केलेल्या बालकांचे दर सात दिवसांनी वजन घेतले जात आहे. अंगणवाडी सेविकांनी आता आॅनलाईन गोषवारा पाठवून कुपोषित मुलांचा आढावा द्यायचा आहे.
४७३ कुपोषित बालकांना आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:08 AM