शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण

By विजय पाटील | Published: August 27, 2022 12:16 PM

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

हिंगोली : येथील गड्डेपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील दानपेट्या उघडून त्यातील रक्कमेची तीन दिवस मोजदाद करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ लाख रुपये निघाले आहेत.

या मंदिराच्या दानपेट्या मागील अनेक दिवसांपासून उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या पेट्या भरल्याने भाविकांना दान देण्यासाठी अडचण येत होती. आगामी काळात या ठिकाणी मोठा उत्सव असतो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या मोदकोत्सवाला तर ५० हजारांवर भाविक येथे दर्शनासाठी येतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भाविकांना येथे येता आले नाही.

यंदा मात्र गर्दी उसळणार असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातच नव्हे, तर परराज्यातही या गणपतीची ख्याती पसरली आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांकडून यंदा तयारी सुरू आहे. या काळात भाविकांना दान करता यावे, यासाठी दानपेट्याही रिकाम्या केल्या आहेत. त्यात तीन दिवस केलेल्या मोजणीत ४८ लाख ३८ हजार ५०० रुपयांची रक्कम निघाली आहे. ती बँकेत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.   हि सर्व रक्कम मोजण्यासाठी विश्वस्त मंडळ, भाविक आणि सहाय्यक धर्मदायुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGanesh Mahotsavगणेशोत्सव