हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटिजन चाचणीत हिंगोली परिसर १८७, वसमत परिसर १७३, सेनगाव परिसर १९९, कळमनुरी परिसर २२८ चाचण्यांमध्ये एकही रुग्ण बाधित आढळला नाही. तर औंढा परिसरात १०३ चाचण्या केल्या असता १ रुग्ण बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये हिंगोली परिसरात ४४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ४ रुग्ण बाधित आढळून आले. यात गाडीपुरा १, सावळी तांडा १, जवळा बाजार १, यशवंतनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सेनगाव परिसरात १७ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळून आला नाही. तसेच कळमनुरीतही १२ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात मंगळवारी ४ रुग्ण बरे झाले असून, यात जिल्हा रुग्णालयातील ३ तर कौठा येथील एका बरे झालेल्या रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ९१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापैकी १५ हजार ४९५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरु असून, आजपर्यंत ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या २५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.