हिंगोली जिल्ह्यात एकूण ५४५ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी केली असता एकही बाधित नाही. यात हिंगोली १८६, वसमत ४०, सेनगाव ७८, औंढा १२४, कळमनुरी ११७ अशा चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ४४ पैकी पारडा १ व डिग्रस कऱ्हाळे १ असे दोन बाधित आढळले. औंढा परिसरात ६२ पैकी जोडपिंप्रीत एक, सेनगाव परिसरात १९ पैकी जामदया येथे १, वसमत परिसरात १०९ पैकी सोमठाणा येथे १ बाधित आढळून आला. २८१ पैकी ५ बाधित आढळले. तर आज सामान्य रुग्णालयातून १० व सेनगाव येथून १ असे बरे झालेले ११ जण घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८९० जण बाधित आढळले. यापैकी १५ हजार ४४२ जण बरे झाले, तर ६९ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले. तर ६ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाने ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे.