लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव रंजे : वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता महापूजा करून दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.परिसरातील अनेक गावांतील महिला यात्रेत पायी दाखल झाल्या होत्या. रात्री २ वाजेपासून मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. चार वाजता डॉ. अजय मुंदडा यांच्या हस्ते महापूजा झाली. नंतर दर्शन खुले झाले. सकाळी ८ वाजता झेंडे लावण्याचा तर ११ वाजेला गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांनी े महाप्रसादाचा लाभ घेतला. पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भासह शेकडो गावांतील भाविक यात्रेत दाखल झाले होते. दिवसभरात जवळपास ५० हजारांच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. मंगळवारी रात्री ८ वाजता हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेसाठी हट्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या यात्रेसाठी ग्रा.पं.कार्यालय कंरजाळा व बाराशिव हनुमान मंदिर कमेटी सदस्य परिश्रम घेत आहेत.
बाराशिव यात्रेत पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 AM