हिंगोली : तूर व हरभऱ्याचे हमीभाव केंद्र १५ जुलैपासून बंद झाले असले तरीही अजून काही ठिकाणचा माल वखार महामंडळाच्या गोदामापर्यंत पोहोचलेला नाही. परिणामी, चुकारेही रखडले असून ४५ हजार क्विंटल हरभरा तर ५ हजार क्विंटल तुरीची एकूण २४.६४ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे.
हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे चालविण्यात येणाऱ्या सातपैकी सहा केंद्रावरच हरभरा खरेदी झाली. यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, जवळा बाजार, साखरा येथील केंद्रावर खरेदी केली. या केंद्रावर माल देण्यासाठी ९८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. याची रक्कम जवळपास ५८ कोटी रुपये एवढी होती. खरेदी केलेल्या मालापैकी ५१ हजार ३0३ क्ंिवटल हरभराच वखार महामंडळाच्या गोदामात जमा केल्याचे चित्र होते. तर २९ हजार क्ंिवटल माल जमा करणे शिल्लक होते. वखार महामंडळाकडे स्वत:चे गोदाम शिल्लक नाही, तर स्थानिकला भाडेतत्त्वावर गोदाम मिळत नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील माल नांदेड, लातूर जिल्ह्यात जमा करावा लागत आहे.
२४ कोटींचे चुकारे राहिले शिल्लकहिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे ३५ हजार ८३७ क्विंटलचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर ४४ हजार ४९१ क्विंटलचे चुकारे मिळणे बाकी आहेत. त्याची किंमत २१.६८ कोटी होते.
केंद्र निहाय हरभरा खरेदीकेंद्र हरभरा(क्विं.) शेतकरी संख्या किंमत हिंगोली २१४५१.०० १३३१ १०़४५ कोटी कळमनुरी १७१७८.१६ ११८५ ७़८८ कोटी वसमत ३७६२.०० ३२८ १़८३ कोटी सेनगाव १४०१४़०६ ८७० ६़८३ कोटी जवळा बा. १४८१२़५० १२२७ ७़२२ कोटीसाखरा १०१११़०० ६१५ ४.९२ कोटीएकूण ८०३२८़७२ ५५५६ ३९.४0 कोटी