लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगत खटकाळी हनुमान मंदिर येथे ६ मे रोजी दुपारी १ वाजता युवासेनेच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाले.राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिंडे यांच्या संकल्पनेतून हिंगोलीे सहायक धर्मादाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या मार्गदर्शनाखाली हरिओम कृषी विकास संस्था, विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर, संत नामदेव महाराज जीर्णोद्धार समिती, सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, तुळजाभवानी संस्थान घोटा या धार्मिक संस्थांसह विविध सामाजिक संघटनांनी या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदविला. शिवसेनेच्या वतीने हिंगोली शहरात प्रथमच सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या सामूहिक विवाह सोहळ्याला युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहता आले नसल्याने दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. मंगलमय सोहळ्यात सनई चौघडे फटक्यांच्या आतषबाजीत सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, भावगीत गाऊन वºहाडी मंडळीला पर्वणी देण्यात आली. वधू-वरांना स्वतंत्र तयारीसाठी मंडप उभारण्यात आला होता. १ लाख नागरिक उपस्थित राहू शकतील, असा सभामंडप जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. सनईच्या सुरामध्ये वधू-वरांना संसरोपयोगी वस्तू माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर यांच्या वतीने देण्यात आल्या. वधू-वरांना आयोजकांच्या वतीने मणी मंगळसूत्र, शालू, बूट, सफारी, जोडवे, भांडी इ. साहित्यासह संसार उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या.वधू-वरांच्या मेकअपची जबाबदारीही ब्युटी पॉर्लरने स्वीकारली होती. विवाह सोहळ्यात ९ दिव्यांग जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. पुढीलवर्षी २७ जानेवारी रोजी १०१ जोडप्यांचा शुभविवाह आयोजित केला जाणार असल्याचे युवा सेनेचे दिलीप घुगे यांनी सांगितले.यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी केले.यावेळी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आ. जयप्रकाश मुंदडा, नांदेडचे आ. हेमंत पाटील, परभणी आ. राहुल पाटील, अकोला आ. गोपीकिशन बजोरिया, जिल्हा प्रमुख संतोष बांगर, युवा सेना अधिकारी दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर, भैय्या पाटील गोरेगावकर, विठ्ठलराव सराफ, कृउबा सभापती रामेश्वर शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, दिलीप बांगर, बी.डी. चव्हाण, पंडित शिंदे, उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, डी.के. दुर्गे, सुनील काळे, अजय गोपू पाटील, ओमप्रकाश भारुका, शिवाजी पवार, राम कदम, कडुजी भवर आदी उपस्थित होते.सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थितीती राणार होती. परंतु काही कारणामुळे ते या विवाह सोळ्यास येऊ शकले नाहीत. त्यामुळे ठाकरे यांनी नव विवाहितांना दृूरध्वनीवरून पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:37 PM