कोरोनामुळे मार्च महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यत तपासणी बंद होती, कार्यालय मात्र चालू होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ६१८ वाहने पकडली. यामध्ये १६३ वाहने ही निकाली काढण्यात आली. या वाहनांकडून १ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. हिंगोली शहरामध्ये २० पीयूसी सेंटर हे अधिकृत आहेत. दुचाकी तपासणीसाठी ३७.३५ रुपये, कारसाठी तपासणी दर ११० रुपये, ट्रकसाठी तपासणी ११० रुपये, जीपसाठी तपासणी दर ११० रुपये, मिनी वाहनासाठी तपासणी दर ११० रुपये असा आहे. जिल्ह्यात १ लाख ९० हजार ३८८ वाहनांची एकूण संख्या आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० या आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ७ हजार २५१ वाहनांची प्रदूषण चाचणी करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
पीयूसी केली नाही म्हणून
१६३ वाहनांना दंड
हिंगोली शहरात प्रदूषण नियंत्रण चाणणी करणारे (पीयूसी) सेंटर हे पेट्रोल आणि डिझेल मिळून २० आहेत. वाहनांच्या सुरक्षिततच्या दृष्टीने प्रत्येकाने पीयूसी काढणे गरजेचे आहे. परंतु, बरेच जण याकडे कानाडोळा करतात. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या वर्षात ६१८ वाहने पकण्यात आली. यानंतर १६३ वाहने निकाली काढून त्यांच्याकडून दंडापोटी १ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
प्रत्येकाने वाहनाची पीयूसी करुन घ्यावी
वाहनचालकाने आपल्या वाहनाची नियमित तपासणी करुन पीयूसी करुन घ्यावी. वाहनाची तपासणी करुन घेतल्यास प्रदूषणाला आळा बसतो.
विशेष म्हणजे वाहनातील दोषही निघून जातात.
अनंता जोशी
उप प्रादेशिक अधिकारी, हिंगोली