लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नर्सी नामदेव येथे प्रतिक फाऊंडेशन, व्यंकटेश नेत्रालय हिंगोली तर्फे मोफत नेत्ररोग तपासणी औषधोपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर घेण्यात आले.शिबीरामध्ये नेत्ररोग तज्ज्ञाद्वारे एकूण ५३ रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रीया करण्यात आलेल्या रूग्णांना व्यंकटेश नेत्रालय येथे मोफत चष्मे व ब्ल्यांकेट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, डॉ. गोपाल कदम, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशन लखमवार, डॉ. सोनाली कदम, डॉ. नेहा लखमावार बोधगिरे, डॉ. प्रल्हाद शिंदे यांच्यासह दवाखान्यातील स्टाफ उपस्थित होता.
५३ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रीया; साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:58 PM