हिंगोली जिल्ह्यात २५ रोजी हिंगोली १९६, वसमत ८७, सेनगाव ३५०, कळमनुरी १८३ चाचण्या केल्यानंतर एकही बाधित नाही, तर औंढ्यात २३३ पैकी जवळा बाजार येथे एक बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये हिंगोलीत ८० पैकी देवडानगर भागात दोन बाधित आढळले, तर कळमनुरीत १३४ पैकी एस.एस.बी येलकी येथे ३ बाधित आढळून आले. वसमतला ३५, औंढ्यात १४३ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले नाही.
आज बरे झाल्याने पाच जणांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून २, सेनगावातून १, कळमनुरीतून १ व वसमत येथून एकास घरी सोडले. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे १५ हजार ९२८ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५१० जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर ३८१ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३७ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.