लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत फक्त ६० शेतकºयांनीच सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली असून मूग, उडीदाची नोंदणी मात्र एकाही शेतकºयाने केली नाही.किमान आधारभूत दराने खरीप हंगाम २०१८-१९ या वर्षात नाफेड या संस्थेमार्फत मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीत या शेतमालाची आॅनलाईन नोंदणी करणे सुरू आहे. या शेतमालाची आॅनलाईन नोंदणी व खरेदी तोंडापूर येथील कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. मूग, उडदाची २४ आॅक्टोबरपर्यंत तर ३१ आॅक्टोबरपर्यंत सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केल्या जाणार आहे. ११ आॅक्टोबरपासून कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतमालाची आॅनलाईन नोंदणी करणे सुरू आहे.आॅनलाईन नोंदणीसाठी सातबारा, पीक पेरा, तलाठी पेरा पत्रक, बॅक पासबूक, आधारकार्ड या कागदपत्राची आवश्यकता आहे. तसेच हरभºयाची आॅनलाईन नोंदणी करूनही फक्त ५६ शेतकºयांच्याच मालाची खरेदी करण्यात आली होती. हरभºयाची नोंदणी करूनही अनेक शेतकºयांचा हरभरा खरेदी दिला गेला नाही. त्यामुळे यंदा नोंदणीस अल्पप्रतिसाद दिसत आहे.आदेशाची प्रतीक्षा : तालुक्यातच विक्रीशासनाकडून आदेश येताच नाफेड मार्फत किमान आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदी केला जाणार आहे. मुगाला ६९७५ रुपये, उडीद- ५६०० रुपये तर सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव राहणार आहे. शेतकºयांची ज्या तालुक्यात जमीन आहे. त्याच तालुक्यात शेतमाल विकणे बंधनकारक आहे. विक्रीनंतर शेतमालाची रक्कम शेतकºयांच्या थेट बँक खात्यावर आॅनलाईन जमा होणार आहे. मागील वर्षीही काही शेतकºयांचा सोयाबीन आॅनलाईन नोंदणीनंतरही घेण्यात आला नव्हता. सोयाबीन खरेदी बंद करण्याच्या सुचना शासनाकडून आल्या होत्या.गत वर्षी शेतकºयांना नाफेडला नोंदणी करून सोयाबीन विक्री केली होती. या सोयाबीनचे चुकारे जवळपास दोन ते तीन महिन्यानंतर मिळाले. त्यामुळे यावर्षी शेतकरी नोंदणी करण्यास धजावत नाहीत.
६० शेतकऱ्यांनीच केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:14 AM