लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यात गत वर्षीच्या तुलनेत वीज वितरण कंपनीच्या थकबाकीत दुप्पटीने वाढ झाली असून सेनगाव उपविभागात एकूण ४ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी झाली आहे. सदर थकबाकी वसुलीकरीता वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम तीव्र केली आहे.सेनगाव उपविभागीय कार्यालयांर्तगत सेनगाव १,२ व गोरेगाव शाखा १,२ अंर्तगत ४ शाखामध्ये एकूण १५ हजार ७८२ ग्राहकांकडे ४ कोटी ४४ लाख रुपये अशी मोठी थकबाकी झाली आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती व शेतमालाला असलेला अत्यल्प भाव याचा परिणाम वीज वितरण कंपनीच्या देयके वसुलीवर झाला आहे.गत अर्थिक वर्षात सेनगाव उपविभागात २ कोटी २२ लाख थकबाकी होती.त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे.तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक अशी ४ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी झाल्याने सेनगाव उपविभागात विज वितरण कंपनीच्या वतीने वुसली मोहीम अधिक कडक केली आहे.थकबाकी दार ग्राहकांच्या घरी जावून धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत अनेक घरगुती ग्राहकांसह ६२ गावच्या पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. ही वसुली मोहीम आगामी काळात अधिक तीव्र होणार असून वीज ग्राहकांनी वसुली मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी उपकार्यकारी अंभियता नितीन लगडेवार यांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यात ६२ गावचे नळ कनेक्शन तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:42 AM