आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात एक सदस्य बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. १०५०३ मतदारांपैकी ६ हजार ६४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६३.२४ टक्के एवढे मतदान झाले असून, १६ जागांसाठी लढत दिलेल्या ३२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत सीलबंद झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, संभाजी लेकुळे, स्थानिक बीट जमादार संजय मार्केसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद कन्याशाळेच्या मतदान केंद्रांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. निवडणूक निरीक्षक, नांदेडचे उपजिल्हाधिकारी खल्लाळ यांनीही मतदान केंद्रांना भेट देऊन सर्व मतदान कर्मचाऱ्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या.
आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीसाठी ६३.२४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:35 AM