लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राहकांच्या हक्काचे व हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याससाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली. हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक झालेल्या अनेक जागरूक ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारणकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. २००६ रोजी मंच स्थापन झाल्यापासून ६९५ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी एप्रिल २०१८ पर्यंत ६५० प्रकरणे निकाली लागली आहेत. तर उर्वरित ४५ प्रकरणे मंचाकडे प्रलंबित आहेत. विविध पतसंस्था, इन्श्युरन्स कंपनी व महावितरण यांच्याकडूनच जास्तीत-जास्त ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तकारी येत आहेत.ग्राहकांची फसवणूक करणारे विक्रेते, सेवा पुरवठादार यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्या संबंधित कंपनी, विक्रेता किंवा पुरवठादाराकडून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ग्राहकांना नुकसान भरपाई मिळवून दिली.परंतु हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला मागील चार महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे न्यायालयीन कामकाज अध्यक्ष व सदस्य पाहतात. दोघांच्या उपस्थितीमध्ये खटला चालतो. परंतु अध्यक्ष पदच रिक्त असल्यामुळे न्यायालयीन कामे ठप्प आहेत.हिंगोली येथील अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रकरणे प्रलंबित आहे. कार्यालयीन कामे सुरू असली तरी न्यायालयीन कामकाज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून सध्या पदभार कोणाकडे देण्यात आला नाही. त्यामुळे मागील चार महिन्यांत एकही न्यायालयीन प्रकरण निकाली लागले नाही. ग्राहकांच्या तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी येथील रिक्त असलेले अध्यक्षपदी नियुक्तीची आवश्यकता आहे. यापुर्वी जिल्हा तक्रार निवारण मंच येथे अध्यक्षा म्हणून ए. जी. सातपुते काम पाहत होत्या.दोन सदस्य कार्यरत, अध्यक्षपद मात्र रिक्तचकांकरिया यांची नियुक्ती - हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील रिक्त असलेल्या सदस्यपदी निता कांकरिया यांची नियुक्ती केली आहे. चार महिन्यांपूर्वी अध्यक्ष व एक सदस्य येथील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढत असत. आता कांकरीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांकरीया १० मे रोजी रूजू झाल्या आहेत. आता दोन सदस्य असले तरी, अद्याप अध्यक्षाचे पद मात्र रिक्त आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे निकाली लागत नाहीत. शिवाय संबंधित कर्मचाºयांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारणची ६५० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:17 AM
हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत.
ठळक मुद्देग्राहकांच्या फसवणुकीच्या अधिक तक्रारी पतसंस्था, विमा, महावितरणबाबत