शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:19 AM

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठा फटका बसला. तर आता रबीची आशाही माळवली आहे. पाणी नसल्याने कोरडवाहू शेतीतील शेतकºयांना तर हरभरा, करडईसारख्या पिकांनाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात म्हणजे जून ते आॅक्टोबरदरम्यान ८८४ मिमी सर्वसाधारण पावसाचे प्रमाण असते. मात्र ६८४ मिमी पर्जन्य झाले. हे प्रमाण ७७.३0 टक्के आहे. गतवर्षीही ६३९ मिमीच पाऊस झाला होता. हे प्रमाण ७१ टक्के होते. त्यामुळे सतत दुसºया वर्षी पावसाने जिल्ह्याला दगा दिलेला आहे. असे असले तरीही आॅगस्ट महिन्यात तेवढा एकदाच मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी ओसंडून वाहात होते. तर बहुतांश लघुप्रकल्प याच पावसामुळे तुडुंब झाले. मात्र नंतर पावसाचा पत्ता नसल्याने असाच ३0 टक्क्यांपर्यंत अनेक ठिकाणचा जलसाठा घटला आहे. तर काही ठिकाणी उपशाचा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात पारोळा-७४ टक्के, वडद-७0 टक्के, चोरजवळा-७४ टक्के, हिरडी-५२ टक्के, सवड-७0 टक्के, पेडगाव-७२ टक्के, हातगाव-६७ टक्के एवढा जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यात सवना ७५, पिंपरी-५५, बाभूळगाव-७६, घोडदरी-२५, औंढा तालुक्यातील वाळकी- ६३, सुरेगाव-४६, औंढा-९२, सेंदूरसना-७४, पुरजळ-६८, वंजारवाडी-७७, पिंपळदरी-७७, काकडदाभा-७३, केळी-६६ टक्के तर कळमनुरी तालुक्यात कळमनुरी-७0, बोथी-९२, दांडेगाव-८४, देवधरी-७४, वसमत तालुक्यातील राजवाडी-७६ तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावात ८७ टक्के जलसाठा असल्याचे अहवालात दिसते.चार कोल्हापुरी बंधाºयांमध्ये एकूण ५६ टक्के जलसाठा आहे. यात चिंचखेडा-५७ टक्के, खेर्डा-२२ टक्के, खोलगाडगा-४२ टक्के तर राहाटीत वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे सध्या १00 टक्के जलसाठ्याची नोंद असल्याचे दिसून येत आहे.यंदा धरणांचे चित्र मात्र विदारक आहे. इसापूर धरणात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असला तरीही येलदरी धरणात ८.८0 टक्केच जलसाठा उरला. सिद्धेश्वरमध्ये तर अवघा २.७४ टक्के जलसाठा असून हे धरण मृतसाठ्यात जाण्यात आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर लघुप्रकल्पांसह कोणत्याही जलसाठ्यात पाणीउपसा करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनास आदेश दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प