जिल्ह्यात शनिवारी हिंगोली परिसरात १२, सेनगाव १७, औंढा २६, वसमत ४८ आणि कळमनुरी येथे ३३५ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी केली असता कळमनुरी परिसरात शेवाळा येथे १ रुग्ण आढळून आला. तसेच हिंगोली परिसरात ५६, सेनगाव ११३, औंढा २५, वसमत ४०, कळमनुरी परिसरात ४२ जणांची आरटीपीसीआर तपासणी केली असता सेनगाव परिसरात कवरदरी येथे ६ रुग्ण आढळून आले. दरम्यान, ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात नवीन कोरोना हॉस्पिटल १, औंढा १ आणि कळमनुरी येथील ३ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनाचे १५ हजार ९८६ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १५ हजार ५८० रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला १९ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
कोरोनाने एकाचा मृत्यू
हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या शेवाळा (ता. कळमनुरी) येथील ३४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३८७ झाली आहे. मागील काही दिवसांत कोरोनाने मृत्यू होण्याच्या प्रकाराला ब्रेक लागला होता. आता रुग्ण संख्याही वाढत असल्याचे दिसत आहे.