शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा; ७०० वर्षांची परंपरा पाळत वाईत ४० हजार बैलजोड्यांची हजेरी

By विजय पाटील | Published: August 27, 2022 12:03 PM

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वाईत भरतो महापोळा, रात्रीपासूनच येत होत्या बैलजोड्या 

हिंगोली : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीच्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्याला मराठवाड्यासह विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात बैलजोड्या आल्याने यंदा विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरोनामुळे दोन वर्षे साध्या पद्धतीनेच पोळा झाल्यानंतर यंदा मोठा उत्साह दिसून आला. .

वाई (गोरखनाथ) येथे ७०० वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर निमित्त ऐतिहासिक बैलपोळा साजरा केला जातो. गोरखनाथ देवस्थानाला प्रदक्षिणा घालण्याकरिता जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बैलजोड्या येथे येतात.  गोरखनाथाचे दर्शन घेतल्यास बैलांना कोणताच आजार होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते.

वाई गोरखनाथ संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नाष्टा व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येते. बैलांसाठीही चारा व्यवस्था येथे मोफत उपलब्ध करुन दिला जातो. तसेच जिल्हा परिषद पशु संवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाची मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यासाठी शिबिरही घेण्यात आले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा या महामार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळविण्यात आली होती. या पोळ्यासाठी यंदा जवळपास ३५ हजार बैलजोड्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत हजेरी लावली होती. यंदा जवळपास ५० हजार बैलजोड्या हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती