हिंगोली : जिल्ह्यात १६ मे रोजी ७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये ६ रुग्ण रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये तर ६५ आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर १४९ रुग्ण बरे झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये हिंगोली परिसरात २८ पैकी रेल्वे वसाहत २, एसआरपी कँप १, हिंगोली येथे १ रुग्ण आढळून आले. औंढा परिसरात अंजनवाडा १, औंढा १ असे दोन रुग्ण आढळून आले.
आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात माळधामणी ६, कंजारा १, बळसोंड १, आंमला १, सुराना नगर १, एसआरपीएफ कँप १, पिंपरखेड १, हिंगोली ३, माळहिवरा १, डिग्रस १, खांडेगाव १, सावरकर नगर १, जवळा पळसी १, पाझर तांडा १, इंदिरा नगर १, गंगानगर १, अंभेरी १, केळीतांडा १, जलालढाबा १, हिंगोली २, राहोली खुर्द १, महसूल वसाहत १, ढोलउमरी १, जिजामाता नगर १, कनका १, सुलदली बु. १, वसमत १, स्वानंद कॉलनी, वसमत २, पळसी १ असे ३८ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात हर्षनगर १, पिंपळगाव १, आरळ १, खांडेगाव २, मुडी १, वखार १, वसमत १, भोसी १, हट्टा ३, बोरगाव १, करंजी १, वसमत १ असे १५ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात तळणी १, पळसी १, सिंनगी १, सेनगाव ३, कहाकर ३, खांबासिंनगी १, धानोरा २ असे १२ रुग्ण आढळले. दरम्यान, रविवारी १४९ रूग्ण बरे झाले. यात जिल्हा रुग्णालयातील ५९, कळमनुरी १४, औंढा ५५ , सेनगाव ६, वसमत ८, लिंबाळा येथील ७ बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत १४ हजार ८३३ रुग्ण आढळले असून यापैकी १३ हजार ९७८ रुग्ण बरे झाले. सध्या ५४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी ३२० जणांना ऑक्सिजन मशीनवर तर ३५ रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
रविवारी पाच जण दगावले
रविवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये अंजनवाडा येथील ६८ वर्षीय महिला, मेहकर येथील ५२ वर्षीय महिला, कंजारा (औंढा) येथील ५५ वर्षीय महिला, तपोवन (औंढा) येथील ५६ वर्षीय महिला, लक्ष्मण नाईकतांडा (औंढा) येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.