लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे आदर्श महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात १४७२ पैकी २४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कळमनुरीत ४३ तर वसमतला १५ गैरहजर होते.उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवकुमार कांबळे, बोथीकर, वीरकुंवर आदींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. हे दुसरे प्रशिक्षण होते. यात केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनबाबत माहिती दिली. आधी एकत्रित व नंतर ५0 व १00 जणांच्या तुकड्या पाडून त्यानुसार प्रशिक्षण दिले. मास्टर ट्रेनर म्हणून एकनाथ कºहाळे तसेच आयटीआयच्या कर्मचाºयांनी काम पाहिले. एकूण २५ हॉलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तर याबाबतच्या शंका व समस्यांचे निरसनही केले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व निवडणूक निरीक्षक जे.रविशंकर यांनी भेट दिली.१५ कर्मचारी गैरहजरवसमत : लोकसभा निवडणुकीतील अधिकारी कर्मचाºयांसाठीचे दुसरे प्रशिक्षण रविवारी वसमत येथील बहिर्जी विद्यालयात पार पडले. या प्रशिक्षणास १५ कर्मचाºयांनी दांडी मारली. त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. वसमत मतदारसंघात ३२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी राहणार आहेत. शिवाय राखीव कर्मचारी ही आहेत. अशा १६५० कर्मचाºयांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. यास उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नीलेश पळसकर, सचिन जैस्वाल, सचिन जोशी, लता लाखाडे, शेख सत्तार, गायकवाड, सुरनर, शेख शफी आदींनी मार्गदर्शन केले.
८२ कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणाला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:13 IST