शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

८२४७ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:14 AM

शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन पाहणी केली.जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सेनगाव, हिंगोली, वसमत, कळमनुरी व औंढा येथील एकूण ९६ केंद्रावरून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिक्षण विभागातर्फे परीक्षा केंद्रांना भेटीसाठी पथकांची नियुक्ती केली होती. हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील परीक्षा केंद्रास शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, केंद्रेकर, लोंढे, भगत तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे, गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी वसमत येथील बर्हिजी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.शिक्षण विभागामार्फत रविवारी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. हिंगोली तालुक्यातील केंद्रावरून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेस एकूण ११२७ पैकी १०८८ जणांनी परीक्षा दिली. तर ३९ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. सेनगाव ८६० पैकी ८४३, १७ गैरहजर राहिले. वसमत ९४४ पैकी ९३१ मुलांनी परीक्षा दिली. १३ उनुपस्थित होते. कळमनुरी ९४३ पैकी ९११ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. ३२ जण परीक्षेस गैरहजर होते, तर औंढा नागनाथ ८४० पैकी ८२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. एकूण ४७१४ पैकी ४५८९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ११६ अनुपस्थित राहिले.आठवीतील परिक्षार्थी४हिंगोली तालुक्यातील परीक्षा केंद्रावरून इयत्ता आठवीतील एकूण ९४८ पैकी ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २९ विद्यार्थी गैरहजर होते. सेनगाव ५३९ पैकी ५२१ जणांनी परीक्षा दिली. १८ अनुपस्थित, वसमत ८०७ पैकी ७८३ मुलांनी परीक्षा दिली. २४ गैरहजर, कळमनुरी ८६९ पैकी ८३७ विद्यार्थी परीक्षेस बसले. तर ३२ अनुपस्थित होते. औंढा नागनाथ ६०३ पैकी ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १४ गैरहजर होते. एकूण ३७६६ पैकी ३६४९ जणांनी परीक्षा दिली.