अँटिजन चाचणीत २७९ पैकी १७ जण बाधित आढळून आले आहेत. त्यात हिंगोली परिसरात जिजामातानगर १, कोथळज १, जिल्हा रुग्णालय १, नर्सी ४, सिरसम २, गाडीपुरा १, अकोला बायपास १, पंचायत समिती क्वाॅटर्स १, सेनगाव परिसरात उटी पूर्णा १, हिंगोली १, रिधोरा १, सेनगाव १, कळमनुरी परिसरात पेठवडगाव १ असे रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गंगानगर २, पारडा १, नामदेव नगर २, एसआरपीएफ २, पुसद १, सुकाणू १, जिजामातानगर १, गोविंदनगर १, बावणखोली २, केंद्राा १, सुराणानगर १, सेनगाव १, तोफखाना १, गोरेगाव १, मस्तानीपेठ १, भटसावंगी ४, शिक्षक कॉलनी १ असे २४ रुग्ण आढळले. वसमत परिसरात कोठारी ३, मरडगा १, लिंगी १, शासकीय वसाहत वसमत १, खांबाळा १ असे ७ रुग्ण आढळले. मन्नास पिंपरी १, गोरेगाव ३, सेनगाव २, पळशी १, ब्रह्मवाडी १ असे व रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात कळमनुरी ४, वसमत ३, हदगाव ४, महारी बु. १, सांडस १, सेलसुरा १, हिंगोली २, जटाळवाडी १, जामगव्हाण १, गौळ बाजार २, मालेगाव १, धानोरा १, बाळापूर ३, नरवाडी १, एसएसबी येलकी ४, मसोड ३ असे ३३ रुग्ण आढळले. औंढा परिसरात जवळा ३, बेरुळा १, बोरी १, औंढा १ असे ६ रुग्ण आढळले.
बरे झाल्याने हिंगोली रुग्णालयातून ४३, कळमनुरीतून १५, औंढ्यातून ८, सेनगावातून ३, वसमतमधून १८ असे एकूण ८७ रुग्ण घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात १४९९० रुग्ण आढळले. यापैकी १४१३० जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला. सध्या ५४३ जण उपचार घेत आहेत. यापैकी २९६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील २६४ जण ऑक्सिजनवर तर ३२ जण बायपॅपवर आहेत.
तीन जणांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने आज आयसोलेशन वाॅर्डात दाखल तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात पुसद येथील ४५ वर्षीय पुरुष, सापळी येथील ६० वर्षीय महिला, कौठा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.