माझे वय ७६ वर्षे आहे. मी कवठा येथील आरोग्य केंद्रात १० दिवस उपचार घेतले. चांगल्या सुविधा मिळाल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. धीर दिला. शुगर व रक्तदाबाचा आजार असतानाही बरे होऊन घरी परतली आहे.
आरुणाबाई सवनेकर, हिंगोली
मी आधी नांदेडला उपचारासाठी गेलो होतो. तेथे बेड न मिळाल्याने कळमनुरीत कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. पहिल्या दिवसापासून योग्य उपचारामुळे १७ चा एचआरसीटी स्कोअर असतानाही काही रेमडेसिविर इंजेक्शनच्या बळावर या आजारातून ११ व्या दिवशी बाहेर पडलो. धीर ठेवून व यंत्रणेवर विश्वास ठेवून उपचार घेतल्यास काही अपाय होत नाही.
शेख रहीम शेख इब्राहिम, हिंगोली
मी सहा दिवस सिद्धेश्वर येथील रुग्णालयात उपचार घेतले. शुगर व रक्तदाबाचा आजार असल्याने आधी ऑक्सिजनवर होते. मात्र त्यानंतर सहा दिवसांत घरी बरी होऊन परतली. त्यामुळे हा आजार झाल्यास वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.
-चित्राबाई बळीराम झाडे, खुडज
पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर
हिंगोली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १५ते १७ टक्क्यांच्या दरम्यानच आहे. नागरिकांनी खबरदारी घेऊन शासनाने जाहीर केलेले नियम पाळले तर तो कमी करणे शक्य आहे. मात्र अनेकजण तो नियम पाळत नाहीत.
घाबरून न जाता उपचार घेणे महत्त्वाचे
इतर आजारांप्रमाणेच काेरोना हा एक आजार आहे. मात्र त्याला घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे. तरच रुग्ण औषधोपचारांना प्रतिसाद देतात. अनेकजण बाहेरील ऐकीव माहितीच्या आधारे हिंमत खचतात. त्यामुळे रुग्णांना धोका होण्याची भीती असते. मात्र रुग्णांनी वेळेत उपचार घेतले तर त्यांना काही होत नाही हे अनेक प्रकरणांमध्ये आढळले. अनेक ज्येष्ठ नागरिक बरे झाले आहेत.
डॉ.गोपाल कदम, हिंगोली
जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख
आतापर्यंत चाचणी केलेल्यांची संख्या १२६६६८
कोरोना निगेटिव्ह आलेली संख्या ११५१००
कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११५६८
कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ९९००
सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या१४८२
रविवार १६४
सोमवार २१६
मंगळवार १७२
बुधवार २०४
गुरुवार १८५
शुक्रवार २४०
शनिवार २८२