हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वसमत तालुक्यात आज बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
'एक मराठा लाख मराठा, अशी घोषणा देत बैलगाडी मोर्चास सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली. वसमत तालुक्यातील महागाव, बोराळा, पांगरा बोकारे, कुरूंद्याचा,आंबा चोंडी , दारेफळ, करंजी हयात नगर आधी ठिकाणचे ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले आहे.मोर्चा संपल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. मोर्चादरम्यान पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी बैलगाडी व बैलांना सजविले आहे. बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा घातल्या आहेत. प्रत्येक गावातून चार ते पाच बैलगाड्या मोर्चाच्या ठिकाणी रवाना होत आहेत.