शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

क्रेडिट सोसायटीच्या अपहारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

By विजय पाटील | Published: July 18, 2023 4:15 PM

खातेदार आपल्या खात्यावरील रकमा पाहत होते; परंतु अनेक खातेदारांच्या रकमा खात्यातून गायब झाल्याने त्यांचे चेहरे पडलेले दिसले.

कळमनुरी (जि. हिंगोली) : येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत झालेल्या अपहारप्रकरणी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह इतर तिघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

क्रेडिट सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन शाखा व्यवस्थापक वसंत घुगे, सहायक शाखा व्यवस्थापक संजय भोयर, रोखपाल गजानन कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी संगनमत करून १ जानेवारी २०२१ ते १ जुलै २०२३ पर्यंत खातेदारांच्या रोख रकमा त्यांच्या खात्यावर जमा न करता आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा गैरवापर करून संस्था व खातेदारांची अंदाजे ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे, असे त्यांनी कबूल केले व संबंधित खातेदारांचे पैसे परत करतो, असे सांगितले; परंतु त्यांनी परत केले नाही. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे करीत आहेत.

दरम्यान, वसंत घुगे व संजय भोयर हे दोघे फरार असून रोखपाल गजानन कुलकर्णी व इतर एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी १८ जुलै रोजी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बुलढाणा अर्बन को-आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अपहार झाल्याची माहिती मिळल्यानंतर १७ व १८ जुलै रोजी खातेदारांनी एकच गर्दी केली होती. खातेदार आपल्या खात्यावरील रकमा पाहत होते; परंतु अनेक खातेदारांच्या रकमा खात्यातून गायब झाल्याने त्यांचे चेहरे पडलेले दिसले. दुसऱ्या दिवशीही बँकेत खातेदारांची एकच गर्दी झाली होती. दिवसभर बँकेच्या घोटाळ्याबाबतच चर्चा सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली