शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 8:45 PM

गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर एका शेतकरी तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे करीत अतिवृष्टीचे अनुदान सरसकट देण्याची मागणी केली आहे.

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांच्या नासाडीमुळे उत्पन्न घटीची शक्यता बघता पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. परंतु शासनाकडून सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीसाठी एकूण ३२ कोटी २३ लाख ४७ हजार २०० रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात असताना गोरेगावसह बाभूळगाव आजेगाव व पुसेगाव हे चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होऊनही अतिवृष्टीतून वगळल्या गेल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ताकतोडा येथील नामदेव पतंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न केला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीतून काही मंडळांना डावलण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आधीच नापिकी, त्यातच कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावीत खासगी फायनान्स कंपन्यांनी नाकीनऊ आणले असून, अशावेळी आम्ही जगायचे कसे ते सांगा? आम्ही रक्ताचा अभिषेक करून आमचा जीव सोडून देऊ, असेही पत्रात नमूद करण्यात आले. तसेच पीक नुकसानीबाबत अतिवृष्टी अनुदान सरसकट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पत्र...रक्ताने लिहिलेले पत्र सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविले आहे. हेच पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे. रक्ताने लिहिलेले पत्र नायब तहसीलदार सुनील कावरखे यांना सुपुर्द केल्याची माहिती नामदेव पतंगे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोली