शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मराठा आंदोलकांचा सरकारच्या भूमिकेवर ‘आसूड’ मोर्चा, बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:41 AM

आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड मोर्चा व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महात्मा गांधी पुतळा परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड मोर्चा व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महात्मा गांधी पुतळा परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला.मराठा समाज बांधवांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी शहरातील महात्मा गांधी चौकात मागील आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. यामध्ये शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. सरकारने खोटे आश्वासन देण्यापेक्षा मराठा आरक्षण जाहीर करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी केली. कळमनुरी तालुक्यातील नांदापूरसह परिसरातील गावातून मराठा समाज बांधव शेकडोच्या संख्येने रॅलीद्वारे ठिय्या आंदोलनस्थळी दाखल झाले. व भजन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठावीरांना श्रद्धांजली अर्पण केली. शासनाने विनाविलंब ९ आॅगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करून सकल मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला. तसेच ठिय्या आंदोलनस्थळी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी होऊन पदाधिकाºयांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.नांदापूर ते हिंगोली रॅली४नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर व सोडेगाव येथील मराठा समाजाचे आंदोलनकर्ते हजारोच्या संख्येने हिंगोली शहरात ठिय्या आंदोलनासाठी दाखल झाले. सोमवारी नांदापूर ते सोडेगाव भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये परिसरातील सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले. त्यानंतर रॅली हिंगोली शहरात येऊन धडकली. हिंगोलीतील गांधी चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात नांदापूर व सोडेगाव येथील सकल मराठा समाज सहभागी झाला.मराठा आरक्षणाच्या मागणीला विविध समाजांचा पाठिंबासेनगाव : येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. अांदोलनाचा दुसºया दिवशी रविवारी आदोलनाला जैन समाज बांधवांनी तर सोमवारी भुसार असोशियनचा पदाधिकाºयांनी भेट देऊन आरक्षणाच्या मागणी करिता जाहीर पाठिंबा दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करिता येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या शनिवार पासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. रविवारी दुसºया दिवशी ठिय्या आदोलनाला आ. तानाजी मुटकुळे, माजी जि.प.उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर यांनी भेट देऊन आरक्षणाचा मागणी करिता पाठिंबा दिला. सकल जैन समाज बांधवांनी या आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. तर सोमवारी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी भेट देऊन आदोलनाला पाठिंबा दिला. शहरातील भुसार असोसिएशनचा वतीने आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. आदोलनाच्या तिसºया दिवशी तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.आरक्षणाच्या मागणीसाठी नर्सी फाट्यावररास्ता रोको४नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील वैजापूर येथील सकल मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी नर्सी फाट्यावर सोमवारी सकाळी ८ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. मुख्य रस्त्यावर टायर जाळण्यात आले होते. रास्ता रोकोमुळे जवळपास २ तास वाहतूक ठप्प होती. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत नर्सी ठाण्याचे सपोनि बालाजी येवते यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा समाजबांधव सहभागी झाला होता. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.जिल्ह्यातील सर्व जि. प. कर्मचारी राज्यव्यापी संपातहिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी ७ आॅगस्ट पासुन तिन दिवसीय राज्यव्यापी संपात सहभागी होणार. महासंघाचे अध्यक्ष गंगाधर सोळंके या संपात ग्रामसेवक युनियन, नर्सेस संघटना, विस्तार अधिकारी संघटना, आरोग्य संघटना, कृषि तांत्रिक संघटना, लिपिक वर्गीय संघटना, पशु चिकित्सा संघटना, बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, हिवताप निर्मूलन संघटना आदी विविध संलग्न संघटना सहभागी होणार आहेत. ७ वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसह ६ दिवसाचा आठवडा करणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, महिला कर्मचाºयांना प्रसूती रजा मंजूर करण्यात यावी, कंत्राटी पध्दत बंद करणे, अंशदायी पेंशन योजना रद्द करणे आदी मागण्या असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोळंके यांनी दिली.ठिय्या आंदोलनात पाचवा दिवस भजनाचावसमत : येथील तहसील व उपविभागीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तालुक्यातील सकल मराठा महिला मंडळीने सहभाग नोंदवून आक्रोश व्यक्त केला. पाचव्या दिवशी तालुक्यातील सकल मराठा समाजासह हयातनगर सर्कलने आंदोलनाची सुत्र सांभाळून भजनाने सरकारचा निषेध केला. यावेळी वीरशैव वाणी समाज संघटनेसह शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनेही आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. ९ आॅगस्ट महाराष्ट्र बंदची हाक देत संवैधानिक मार्गाने आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा