- इस्माईल जहागिरदार वसमत (जि. हिंगोली): जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथून एका व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच हिंगोली जिल्ह्यासह नांदेड पोलिस अलर्ट झाली आहे. रात्री १२ वाजेपर्यंत अपहरणकर्त्यांच्या गाडीचा शोध पोलिस घेत होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता दरम्यानात व्यापारी गणपत आप्पाराव शिंदे (रा. आडा ता. कळमनुरी) यांना एका काळ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या काही जणांनी त्याचे अपहरण केले. अपहरण केलेल्या जिपचा रंग काळा असल्याची माहिती आहे. अपहरण झाल्याचे कळताच आखाडा बाळापूर, वसमत, कुरुंदा, हट्टा, वसमत ग्रामीण, कळमनुरी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील पोलिस अलर्ट झाले होते. राष्ट्रीय व राज्य मार्गावर अपहरकर्त्यांच्या गाडीचा शोध पोलिस घेत होते. मार्गावर जागोजागी पोलिस वाहनांची तपासणी करत होते. रात्री उशिरा पर्यंत अपहरणकर्त्याच्या जिपचा शोध लागला नव्हता.
मध्यरात्री गुन्हा दाखल, तपासासाठी दोन पथकेअपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल होऊन तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात तपासासाठी रवाना झाली आहेत.