शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह तिघांना एसीबीने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 8:34 PM

रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाच्या पाच टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे केली होती.

कळमनुरी (जि.हिंगोली) : नगरपालिका हद्दीत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना कळमनुरी न.प.चे मुख्याधिकारी उमेश कोठीकरसह अन्य दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ जुलै रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास रंगेहाथ पकडले. दरम्यान न. प. कार्यालयातच तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारली.

रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाच्या पाच टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांच्या रक्कमेची लाचेची मागणी न.प.च्या मुख्याधिकारी कोठेकरने तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागहिंगोली यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ जुलै रोजी पडताळणी केली. या पडताळणीत तथ्य आढळून आल्याने १५ जुलै रोजी सापळा रचून नगरपालिका कार्यालयात चाळीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याधिकाऱ्यांना पकडण्यात आले.

लाचेच्या या सापळ्यात नगरपालिकेचे कर्मचारी जाकेर हुसेन, राहुल जाधव यांचाही समावेश असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उमेश कोठीकर यांच्यासह जाकेर अहमद ,राहुल जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही पोलीस उपआधीक्षक नीलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विजय पवार, पोहेका विजय उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, शेख युनूस, हिम्मतराव सरनाईक आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग