कुरुंदा : वसमत तालुक्यातील आंबा चौंडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत बंदुकीचा धाक दाखवून बॅंक लुटण्याच्या प्रयत्न प्रकरणातील आरोपींकडून २ गावठी, त्यात एक १२ राऊंड बोरची तर दुसरी ९ राऊंडची बंदूक आढळून आली. त्याचबरोबर १० जीवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. या आरोपीला वसमत न्यायालयात शनिवारी हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आंबा चोंडी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्यासाठी आलेल्या आरोपीं मोठ्या शिताफिने कळमनुरी तालुक्यातील बोथी शिवारात पकडले. आरोपींकडील काळ्या रंगाची स्कुलबॅग पाण्यात पडली होती. या बॅगचा शाेध घेत, त्यामध्ये २ गावठी बंदूक, १० जीवंत काडतुसे सापडली. त्याशिवाय खंजीर, नळबोळट, लोखंडी प्लेट व इतर साहित्य आरोपींकडे आढळून आले.
वसमत सत्र न्यायालयात शनिवारी आरोपी आयास अहेमद गफूर वय ३०, रा. सोमवार पेठ, वसमत जि. हिंगोली, संदिप मटरू यादव वय २२, रा. धोराधार ता. जि. वाराणसी उत्तरप्रदेश, शाबान जमील अन्सारी रा. नानपारा जि. बहेराज, उत्तरप्रदेश याना हजर केले असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली दिली असल्याची माहिती सपोनि सुनील गोपीनवार यांनी दिली. या तपासणीत आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास पोलीस करीत आहेत.
इतर दाेन गुन्हाची कबुलीया आरोपींनी वाई गोरखनाथ जवळील पेट्रोलपंप लुटण्याचा प्रकार व वसमत येथील गॅस एजन्सीचे पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. या दोन्ही गुन्ह्याची कबुली आरोपींनी पाेलीस तपासणीत दिली आहे.