शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खूनप्रकरणातील आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:36 AM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी हरिभाऊ सातपुते (रा.कंरजी ता.जिंतूर) यास सेनगाव पोलिसांनी दहा महिन्यानंतर अटक केली.तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचे १ जानेवारी रोजी अपहरण करुण खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून अतिशय शिताफीने सुपारी देवून केलेल्या खुन प्रकरणाचा सेनगाव पोलीसांनी ४८ तासांत उलगडा केला होता. या प्रकरणातील पोलीसांनी रतन हरिभाऊ खटके रा.रामपुरी ता.पाथरी याच्यासह विजय देवकर, हरीष बाबुराव मिरेकर, इम्रान युनूस शेख (सर्व रा.नाशिक) या चार आरोपींना अटक केली होती. खून प्रकरणातील मुख्य आरोपी हरीभाऊ सातपुते, शिबु आप्पा पुजारी (रा.नाशिक) हे खुनाचा उलगड्यानंतरही फरार झाले होते. आरोपी अटकेच्या मागणीसाठी मयत पोले यांच्या नातेवाईकांनी जिल्हाकचेरी समोर उपोषणही केले होते. अखेर मंगळवारी सकाळी पोलीसांच्या शोध मोहिमेला यश आले. गुप्त माहितीवरून मुख्य आरोपी सातपुते यास नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजता सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोनि सरदारसिंह ठाकूर, सपोउपनि एम.एम.टाले, अनिल भारती आदींनी केली. रतन खटके यास उच्च न्यायालयाने जामीन दिला, तर अन्य एक अल्पवयीन असल्याने त्यास सत्र न्यायालयाने जामीन दिला. दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एक आरोपी फरारच आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी