सध्या पूर्णा नदी परिसरातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. याबाबत औढा महसूल विभागाच्या वतीने कारवाई सुरूच आहे. तरीही रात्रीला चोरून याठिकाणी वाळूचा उपसा सुरूच आहे. यामुळे हट्टा पोलिसांचे पथक नदीपात्रातील एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर यामध्ये वाळू भरलेली आढळून आली. तसेच चार ट्रॅक्टर व ट्रॉलीची किंमत एकूण ५ लाख रुपये असा एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद जमादार बी. जी. राठोड यांनी दिली. आराेपी ट्रॅक्टर चालक पंढरीनाथ हिराजी गारकर रा. अनखळी पोटा याच्याविरुद्ध वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नदीपात्रात कारवाई करीत असताना पाणंद रस्त्याने तीन ट्रॅक्टर पोलिसांचे पथक पाहाताच वेगाने धावत होते. त्यांचा पाठलाग करून तिन्ही ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. यामध्ये ट्रॅक्टर विना क्रमांकाचे ट्रॅक्टरचालक अशोक रामचंद्र शिंदे रा. औढा, मारुती गणेश गारकर रा. अनखळी पोटा, एमएच ३८ व्ही ३३७२ चालक विश्वनाथ संभाजी कदम रा. वाई गोरखनाथ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप थडवे, जमादार बी. जी. राठोड, नागनाथ नजान, विशाल काळे आदींनी केली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:29 AM