मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना १४ जानेवारी रोजी मतदान केंद्रावर पोहोचविल्या जाणार आहे. मतदान केंद्रावर वाहनांद्वारे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना पोहोचण्याची रूपरेषा तहसीलने तयार केलेली आहे. मतदान प्रक्रियेची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान केंद्राचे साहित्य देण्यासाठी ३० टेबल ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी राहणार आहेत. या कर्मचाऱ्यांद्वारे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान केंद्राचे साहित्य दिले जाणार. तालुक्यात २७६ मतदान केंद्र असून त्यापैकी १७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलीस बंदोबस्त व इन कॅमेरा मतदान होणार आहे. मतदान केंद्रासाठी १२६७ कर्मचारी तैनात आहेत. ६१५ जागेंसाठी १३६० उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनाने मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली. दर दोन तासाला क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून मतदानाची टक्केवारी घेतल्या जाणार आहे. मतदान १५ जानेवारी रोजी तर मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:25 AM