शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यात सर्वच खाजगी इंग्रजी शाळांना २५ टक्के मोफत विद्यार्थी प्रवेशाची सक्ती आहे. मात्र यात १७ शाळांनी ५९ विद्यार्थ्यांना अजून प्रवेश दिला की नाही? याचाच संभ्रम कायम आहे. तसा अहवाल आॅनलाईन अथवा शिक्षण विभागाकडेही दिला नसल्याने यावरून बोंब सुरू आहे.मागील वर्षीपर्यंत शासनाकडून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यात सर्वच खाजगी इंग्रजी शाळांना २५ टक्के मोफत विद्यार्थी प्रवेशाची सक्ती आहे. मात्र यात १७ शाळांनी ५९ विद्यार्थ्यांना अजून प्रवेश दिला की नाही? याचाच संभ्रम कायम आहे. तसा अहवाल आॅनलाईन अथवा शिक्षण विभागाकडेही दिला नसल्याने यावरून बोंब सुरू आहे.मागील वर्षीपर्यंत शासनाकडून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशासाठी शिक्षण संस्था नाक मुरडत होत्या. शासनाकडून या विद्यार्थ्यांचे परतावा शुल्क वेळेत मिळत नसल्याने हा प्रकार घडत होता. दरम्यान काही संस्थांनी ही रखडलेली रक्कम मिळाल्याशिवाय यंदा प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर यात परताव्याची रक्कम शाळांना अदा करण्यास प्रारंभ झाला. टप्पे पाडून ही रक्कम दिली जात आहे. मात्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही ५९ विद्यार्थ्यांना १७ शाळांमध्ये प्रवेश मिळाला की नाही, याची माहितीच उपलब्ध नाही.यामध्ये खाकीबाबा हिंगोली-२, स्वीस अ‍ॅकेडमी खटकाळी-१, लक्ष्मीबाई घुगे शाळा गंगानगर-४, अन्नपूर्णा स्कॉलर्स-५, शाहू महाराज इं.स्कू. कनेरगाव नाका-२, जेट किडस् हिंगोली-४, म.गांधी मेमोरियल पुसेगाव-१, कै.प्रभावती जैन शाळा वसमत-३, अहिल्यादेवी होळकर शाळा वसमत-१, लालबहादूर शास्त्री शाळा वसमत-८, लालबहादूर शास्त्री शाळा वसमतनगर-७, पिरॅमिड इंटरनॅशनल स्कूल-१, गायत्री शाळा पिंपळा चौरे-१, डायमंड औंढा-२, एमआयपी सेमी जवळा बाजार २, स्वामी विवेकानंद आजरसोंडा-१४ तर रेसन्स शिरडशहापूर येथील एका प्रवेशाचा प्रश्न आहे. यात प्रवेश झाला, नाकारला की मुलगाच शाळेत आला नाही, याची कोणतीच माहिती मुख्याध्यापकांनी दिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे.दुसऱ्या फेरीतील या प्रवेशांबाबत शाळा अजूनही माहिती द्यायला तयार नाहीत. १९ जुलै ही अशी माहिती देण्याची अंतिम तारीख होती. मात्र या तारखेपर्यंत १७ शाळांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. तर या शाळांवर आता कारवाई प्रस्तावित करण्यात येणारअसल्याचे सांगण्यात आले. ही माहिती प्रलंबित असल्याने प्रवेशाची पुढील फेरी घेणे शक्य होत नाही. यातच बराच काळ निघून गेल्याने पुढील फेºयांचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. तर प्रशासनही ही बाब फारसी गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते.६९७ पैकी २९२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचाच अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. अजून ४0५ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे. पुढील फेºयांत ते होतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला.

टॅग्स :englishइंग्रजीSchoolशाळा