लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ: तालुक्यातील उखळी येथील एका विवाहित महिलेला हुंड्या पायी जाळून मारल्याप्रकरणी तबल एका वर्षांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथील गौतम फकीरा राऊत व यशवंत राऊत या दोघांनी मीरा गौतम हिस लग्नानंतर एक वर्षं चांगले वागविले; परंतु त्यानंतर या दोघा भावांनी माहेरून १० हजार रुपये घेऊन ये, असा तगादा लावला व त्यांनी ४ जुलै २०१७ रोजी घरात मीराच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले व घराला बाहेरून कडी लावली यात मीरा ९० टक्के जळली होती. तिच्यावर परभणी येथे उपचार सुरू असताना तिने पोलिसांना जवाब देऊन १९ जुलै २०१७ रोजी प्राण सोडले. रुग्णालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद करण्यासाठी तब्बल एक वर्ष लागले. वरील दोन्ही आरोपीविरोधात पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि मोहन डेरे करीत आहेत.
एका वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:18 AM