हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्यालय तोडफोड करून पेटवले.
जिल्ह्यात आज मराठा आरक्षणआंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आखाडा बाळापुर येथील दाती फाटा येथे आंदोलकांनी रस्तारोको आंदोलन केले. येथे रत्यावर टायर जाळण्यात आले त्यानंतर एका ट्रकला आंदोलकांनी आग लावली. तसेच रेशन कॅम्प येथे असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्र ४ हे कार्यालय आंदोलकांनी तोडफोड करून पेटवले. दुसऱ्या एका घटनेत सेनगावात आंदोलकांनी गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले.