लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात जागतिक एडस् दिनानिमित्त २ डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे व जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम, जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक संजय पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एडस् आजाराबद्दल माहिती व्हावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. जिल्हा रूग्णालयाने तयार केलेल्या चित्ररथाद्वारे सर्वांना या आजार विषयी माहिती दिली जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागात मोहीम राबविली जाणार आहे.यावेळी अनिल भंडारी यांनी चित्ररथाची कशाप्रकारे सजावट केली, कोण-कोणती माहिती त्यामध्ये उपलब्ध आहे, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेस आवश्यक सूचना देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. महिनाभर मोहीम जिल्हाभरात राबवून जनजागृती केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. दुचाकी रॅलीत अधिकारी, कर्मचारी व नागरिक, विद्यार्थी सहभागी होते.
चित्ररथाद्वारे एडस् जनजागृती; दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:33 PM
जिल्हा रूग्णालयात जागतिक एडस् दिनानिमित्त २ डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देहिंगोली : शहरातील मुख्य मार्गावरून चित्ररथाची मिरवणूक; युवकांना मार्गदर्शन