दरवर्षीप्रमाणे यावर्षी बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला ३४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून महापुरुषांचे परिवर्तनशील विचार विविध समाज घटकातील सर्व स्तरापर्यंत पोहचावे या हेतूने दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सदर व्याख्यानमाला ऑनलाईन घेण्यात येणार आहे. व्याख्यान ऐकण्याकरिता दरदिवशी व्हाॅट्स ॲप ग्रुपवर लिंक पाठवण्यात येणार आहे.
डॉ. दिनेश मोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘प्रति क्रांतीच्या उंबरठ्यावर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. शत्रुघ्न जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र भालेराव यांची उपस्थिती असणार आहे. तसेच १८ जानेवारी रोजी डॉ. किर्तीकुमार मोरे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी अध्यक्ष म्हणून युवराज खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर पियुष लोखंडे उपस्थित राहणार आहेत. १९ जानेवारी रोजी प्राध्यापक रवींद्र मुंद्रे हे ‘संपूर्ण क्रांतीसाठी शोषितांच्या खंबीर निर्धाराची गरज’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बी. डी. वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अनिल इंगळे उपस्थित राहणार आहेत. २० जानेवारी रोजी अशोक सरस्वती बोधी हे नागपूर येथून व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफणार आहेत. ‘उद्दिष्ट प्राप्तीसाठी मिशनरी कार्यपद्धती’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून व्ही. जी. ढाले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दयाराम मस्के उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे सचिव डॉ. सुखदेव बलखंडे यांनी दिली आहे.