अनंत चतुर्दशीला विघ्नहर्त्याची कावड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:20 AM2018-09-17T00:20:59+5:302018-09-17T00:21:25+5:30

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे श्रीची स्थापना पालखी सोहळ्याने झाली. अनंत चतुर्दशीला सकाळी ६.०० वाजता श्री.च्या मंदिरापासून कावड निघणार आहे.

 Ananda Chaturdashi is the queen of the troubleshooter | अनंत चतुर्दशीला विघ्नहर्त्याची कावड

अनंत चतुर्दशीला विघ्नहर्त्याची कावड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे श्रीची स्थापना पालखी सोहळ्याने झाली. अनंत चतुर्दशीला सकाळी ६.०० वाजता श्री.च्या मंदिरापासून कावड निघणार आहे.
या कावडीचा मार्ग श्रींचे मंदिर, जमादार विहीर, माहेश्वरी भवन, मंगळवारा, दत्त मंदिर, कयाधू नदी तसेच परतीचा प्रवास कयाधु नदी, दत्त मंदिर, मंगळवारा, माहेश्वरी भवन, छोटा मारोती, कासारवाडा, टाले हॉल, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन, मेडीकल लाईन, गांधी चौक, कपडा गल्ली, मारवाडी गल्ली, मसानी पेठ, ते श्रीचे मंदिर.
श्रीची कावड मंदिरात आल्यावर, सकाळी ८.३० वा श्रींना महाभिषेक होणार आहे. तद्नंतर विधिवत यावर्षी दोन लक्ष एकावन्न हजार मोदकांचा महानैवैद्य दाखवून महाआरती होऊन पूजेचे मोदक वाटपास सुरुवात होईल.
वाढत चाललेल्या गर्दी मुळे ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली असेल त्यांनी दहा दिवसात कधीही १००८ मोदक चढविले तरी चालतात. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या वर्षी अनंत चतुर्दशीर्ला रात्री ००.०५ वाजल्यापासून दर्शन सुरू होणार आहे. यावर्षी आंबेडकर पुतळ्यापासून दर्शनाची रांग चालू होऊन गांधी चौक, महावीर स्तंभापासून श्री विघ्नहर्ता चिंतामणी मंदिरमार्गे श्रींच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतील. या वर्षीही आॅटो संघटना व टेम्पो संघटना भाविकांसाठी मोफत सेवा देणार आहेत.
या वर्षी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून, दोन रांगांमधून दर्शन होईल. दर्शन मंडपात रांगेत लागल्यावर भाविकांचे दर्शन एक ते दीड तासांत होईल, असे नियोजन करण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीने चालू आहे. तसेच अपंग, कर्करोगचे पेशेंट, गरोदर महिला, अति वृद्ध भाविकांसाठी थेट दर्शन दिले जाईल. संस्थानसह विविध संस्थांनी महाप्रसादही ठेवला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राथमिक उपचार सेवा व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने यंदा दर्शन मंडपापासून ते संपूर्ण रांगेतून मंदिरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर शिवाय तीन मोठे एलईडी वॉल लावून, कॅमेऱ्याच्या साह्याने मंदिरातील कार्यक्रम व इतर कार्यक्रम थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. गणेश मंडळांनी अनंत चतुर्दर्शीला जागेवरच विसर्जन करून दुसºया दिवशी मिरवणुकीद्वारे प्रत्यक्ष विसर्जन करावे व या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर संस्थांनचे सचिव दिलीप बांगर यांनी केले आहे.
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल अशी माहिती हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली.

Web Title:  Ananda Chaturdashi is the queen of the troubleshooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.