लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास रात्री अचानक आग लागली. यात लाकडी कपाट, जनावरांची औषधी, कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही जाग शॉटसर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आखाडा बाळापूर येथील भर वस्तीत पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षापासून कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सावंत यांनी ३१ जानेवारी रोजी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता दवाखाना बंद करून गेले. मध्यरात्री दवाखान्यास केव्हातरी आग लागली. १ फेब्रुवारी रोजी सकाळी सेवकाने दवाखाना उघडला असता मधल्या साहित्याची राख झाल्याचे दिसले. या आगीत इलेक्ट्रिक मीटर, वायर, दवाखान्यातील सर्व नोंदवह्या, संचिका, एक लाकडी टेबल, लाकडी कपाट, स्टील कपाट, रिव्हॉल्विंग स्टूल तसेच जनावरांच्या उपचार कामी लागणारी संपूर्ण औषधे, उपकरणे, जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी डॉ. संजय सावंत यांच्या तक्रारीवरून बाळापूर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पशु वैद्यकीय दवाखान्यास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:41 PM