हिंगोली : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी असलेले अनोखे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज म्हणाले की, ‘विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी घेण्यात आलेले हे एक अनोखे स्नेहसंमेलन आहे. पोदार शाळा नेहमीच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी विविध सृजनात्मक उपक्रम घेत असते. त्या उपक्रमास विद्यार्थीसह पालकही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देतात, तसेच यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले की, ‘पोदार शाळा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळापासूनच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. पालकांनी मुलांसोबत मोठ्या आनंदाने जगावे. मुलांच्या भाव-भावना समजून घेऊन त्यांच्यासोबत आनंदाने वेळ व्यतीत करावा. त्यामुळे मुले आनंदी राहतील. मुलांच्या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन मीरा कदम यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केले. याप्रसंगी रूपालीताई पाटील गोरेगांवकर, ममताताई सूर्यवंशी, व्यंकट हरिदास रेड्डी, संध्या सिंग तोमर, मुकुंदराज हुंबे, अमोल शेष यांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं.०८