लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा सुरुवातीच्या काळात चांगल्या पावसामुळे पेरणी वेळेवर झाली. मात्र पिकांना दोनदा पावसाचा मोठा ताण सहन करावा लागला. आता सोयाबीन तर केवळ पाण्याअभावी हातचे गेले असून शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे पिकाच्या छायाचित्रासह मेल पाठवून तक्रारी करण्याचे आवाहन भाजप नेते रामरतन शिंदे यांनी केले आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा सर्वच पिकांवर पडलेल्या रोगराईमुळे शेतकºयांना कमी उत्पादनाची भीती आहे. आधी खूप पर्जन्यमान झाल्याने सोयाबीनच्या शेंगा चपट्या झाल्या होत्या. त्यात अर्धे उत्पादन मातीत गेले. नंतर पाऊस थांबला. कडक उन्हामुळे रोग गेला. परंतु पावसाने तब्बल महिनाभराची ओढ दिली. त्यामुळे पुन्हा शेंगा भरण्याच्या टप्प्यात हा प्रकार घडल्याने थेट सोयाबीन वाळून गेले. कपासीला शेंदरी बोंडअळीने पोखरले. हळदीवर खोडअळी आली. अडीच ती तीन लाख हेक्टर क्षेत्र याच प्रमुख पिकांखाली आहे. या पिकांचे हे हाल असतील तर शेतकºयांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. दरवर्षीच विमा कंपन्या हात झटकतात. यंदा रीतसर तक्रारी करून शेतकºयांनी पीकविमा कंपन्यांना पंचनाम्यांसाठी बाध्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
विमा कंपनीकडे तक्रारी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:14 AM