राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युल्स फॉर लाईव्हलीहूडस एन्टरप्राईज’ ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोरोनामुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे, अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास ‘एनएसएफडीसी’ नवी दिल्ली यांच्यामार्फत पाच लाख रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
या योजनेत ‘एनएसएफडीसी’कडून ६ टक्के व्याजदराने चार लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे, तसेच एक लाख रुपये भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.