औंढा नागनाथ: नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना व त्याची व्याप्ती व मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखविल्याने येणाऱ्या निवडणुकीत हे क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग निहाय मतदार याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
औंढा नगरपंचायत निवडणूक जानेवारीमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने येथील १७ प्रभागात निवडणूक विभागाच्या निर्देशाप्रमाणे आरक्षण सोडत व प्रभाग रचना त्याची व्यक्ती जाहीर करण्यात आली होती. याठिकाणी प्रभाग १५ मध्ये आक्षेप नोंदविला होता. जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीनंतर अंतिम मंजुरीसाठी प्रभाग रचना विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. २२ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी या कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. त्यानुसार १७ प्रभागांतील हद्द निश्चित केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग १ लोकसंख्या ९१० पूर्व तळणी गावशिवार पश्चिम अंजनवाडा गावशिवार दक्षिण जि.प. प्राथमिक शाळा उत्तर देवाळा गावशिवार हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आहे. प्रभाग २ लोकसंख्या ९४४ पूर्व तळणी गावशिवार पश्चिम अंजनवाडा रस्ता दक्षिण इनामदार शादीखाना उत्तर जि. प. शाळा असून हा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक ३ लोकसंख्या १०२७ असून पूर्व हिंगोली- परभणी रोड पश्चिम ब्राह्मणवाडा गावशिवार दक्षिण पोलीस ठाणे उत्तर अंजनवाडा गावशिवार हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग ४ मध्ये १०३२ एवढी लोकसंख्या असून पूर्व जि. प. शाळा सैलानी दर्गा रोड पश्चिम हिंगोली- परभणी रोड दक्षिण डॉ. आंबेडकर चौक उत्तर पोलीस वसाहत हा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग ५ लोकसंख्या ९५१ असून पूर्व तळणी गावशिवार पश्चिम बाल स्मशानभूमी दक्षिण देशपांडे शेतजमीन उत्तर कृउबास हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. प्रभाग ६ मध्ये ९३८ लोकसंख्या असून पूर्व पाणंद रस्ता पश्चिम ढवळेश्वर मंदिर दक्षिण दादाराव पाटील चौक उत्तर सैलानी दर्गा हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग ७ मध्ये ८५२ लोकसंख्या पूर्व ढवळेश्वर मंदिर पश्चिम इमली मज्जित दक्षिण रेनबो कॅम्प्युटर उत्तर न.पं. रोड महाराष्ट्र किराणा दुकान हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग ८ लोकसंख्या ८६७ असून पूर्व काजी यांची विहीर पश्चिम इमली मज्जित दक्षिण न.पं. रोड महाराष्ट्र किराणा दुकान उत्तर टिपू सुलतान चौक हिंगोली- परभणी रोड हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग ९ लोकसंख्या ९९१ असून पूर्व दर्गा पश्चिम ईदगाह मैदान सूर्यकुंड तलाव दक्षिण हिंगोली रोड रहीम चौक रोड मुजावर गल्ली उत्तर काजीधरा तांडा हा प्रभाग सर्वसाधारणसाठी आहे. प्रभाग १० मध्ये ९३५ लोकसंख्या असून पूर्व हिंगोली- परभणी रोड पश्चिम सुकापूर गावशिवार दक्षिण बसस्थानक उत्तर सूर्यकुंड तलाव हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसांठी राखीव आहे. प्रभाग ११ लोकसंख्या ८८४ असून पूर्व न.पं. रोड पश्चिम हिंगोली- परभणी रोड दक्षिण गणपती मंदिर विसर्जन मार्ग उत्तर रहीम चौक हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी आहे. प्रभाग १२ येथील लोकसंख्या ९१२ असून पूर्व राम मंदिर देशपांडे वाडा पश्चिम हिंगोली- परभणी रोड दक्षिण जुने बसस्थानक उत्तर गणपती मंदिर विसर्जन मार्ग हा प्रभाग ओबीसीसाठी राखीव आहे. प्रभाग १३ मध्ये ९६४ लोकसंख्या असून पूर्व डॉ. हेडगेवार चौक ते नगरपंचायत रोड पश्चिम हिंगोली - परभणी रोड दक्षिण मुख्य कमान उत्तर रेनबो कम्प्युटर हा प्रभाग ओबीसीसाठी खुला आहे. प्रभाग १४ मध्ये ९६९ लोकसंख्या पूर्व सुरेश जावळे यांचे घर पश्चिम डॉ. हेडगेवार चौक ते न.पं रोड पश्चिम नागनाथ मंदिर उत्तर रावणेश्वर मंदिर हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रभाग १५ लोकसंख्या ८८२ असून पूर्व चंदन व सम्राट चौककडे जाणारा रस्ता पश्चिम रावळेश्वर मंदिर दक्षिण जैन मंदिर उत्तर महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा प्रभाग ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग १६ लोकसंख्या ९२५ असून पूर्व पाणंद रस्ता पश्चिम वेस दक्षिण बाजार मैदान उत्तर जैन मंदिर असून हा प्रभाग खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग १७ मध्ये १०२९ एवढी लोकसंख्या असून पूर्व दरेगाव शिवार पश्चिम गोळेगाव शिवार दक्षिण वगरवाडी शिवार उत्तर नागनाथ मंदिर रिलायन्स मोबाईल टावर असा असून हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. औंढा येथील १७ प्रभागांतील प्रभाग रचना कार्यक्रम अंतिम झाला असून यानुसार आगामी निवडणूक होणार असल्याने अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.