हिंगोली - दोन वर्षानंतर गणेश विसर्जन होत आहे गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील तिन्ही घाटावर आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करता आला नाही. कोरोनाचे नियम पाळण्याच्या दृष्टीने शासनाने घडत सूचनाही जिल्हा प्रशासनाला गेल्यावर जिल्हा प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करत गणेशोत्सव दरीत साजरा करावा अशी सूचना नागरिकांनाही केली होती. यावर्षी कोरोना संपुष्टात आल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. गणेश विसर्जनस्थळी गणेश भक्तांना ताप येणे, मळमळ होणे, उलटी होणे, डोके दुखणे आदींवर आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
आरोग्य विभाग लक्ष ठेवून...
दोन वर्षानंतर गणेश उत्सवाला असल्यामुळे गणेश भक्त आनंदी झाले आहे गणेश विसर्जन यावर्षी उत्साहात होत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सूचनेनुसार शहरातील तिन्ही ठिकाणी आरोग्य पथक करण्यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली होती. शहरातील मोदकोत्सव, चिराग शहा बाबा कयाधू नदी परिसर जलेश्वर मंदिर परिसर आधी ठिकाणी पथक ग्रस्त घालणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
गणेश भक्ताची महावितरण घेत आहे काळजी...
दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन साजरे करता आले नाही. यावर्षी कोरोना संपुष्टात आल्यामुळे गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. याचा आनंद महावितरण कंपनीला असून महावितरण कंपनीने गणेश भक्तांना अडचणी येवू नये मृहणून काळजी घेत आहे. विसर्जन स्थळी कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता महावितरण कंपनीने घेतली आहे.यासाठी सर्व कर्मचारी कामाला लागले असून शहरातील तिन्ही विसर्जनस्थळी सतर्कता बाळगत आहेत.-दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता महावितरण, हिंगोली