मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसरात अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. नगरपरिषदेने वेळीच याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
हिंगोली: शहरातील खटकाळी भागातून गेेलेल्या अकोला बायपासवर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. वेळोवेळी संंबंधित विभागाला कळविण्यात आले, परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
पथदिवे बंद
हिंगोली: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.