लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे.शनिवारी हिंगोली येथील मोंढ्यामध्ये सोयाबीन, तूर आणि हरभºयाची बीट असल्याने शेतकºयांनी शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला होता. सध्या विविध धार्मिक कार्यक्रमांसह लग्न समारंभातून सावरत शेतकरी शेतीच्या कामांकडे वळले आहेत. शेतीच्या कामाला गती आली असून, खरिपाच्या पेरणीसाठी घरात भाव वाढीच्या प्रतीक्षेत दडवून ठेवलेला शेतीमाल अखेर शेतकºयांना काढावा लागला.त्यातही नाफेडच्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांनीही खाजगी बाजारपेठेत शेतीमाल विक्रीस आणला होता. सध्या तुरीची या ठिकाणी ३०० ते ३५० पोते आवक झाली होती. तर तुरीला ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तो हमी भावापेक्षा हजार रुपयांहून अधिक कमी आहे. मात्र याच भावात शेतकºयांनी माल व्यापाºयांना दिला. तसेच सोयाबीनचीही आवक मोठ्या प्रमाणात होती.सोयाबीनला ३ हजार ५०० पासून पुढे भाव मिळाला. जवळपास २०० ते २५० पोत्याची आवक झाली होती. सध्या नाफेड केंद्रावर हरभºयाची खरेदी सुरु असली तरीही शेतकºयांना पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवित खाजगी बाजारपेठेत घेऊन येत आहेत. तर मोंढ्यामध्ये हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार १०० ते ३२०० रुपये भाव मिळाला होता. त्यातच अनेक शेतकरी खता-बियाणाचीही चौकशी करत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतकरी यावर्षी खरिपाची पेरणी करताना विचारपूर्वक करणार आहेत. मागील दोन वर्षांपासून मात्र हळदीला भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे इतर पारंपरिक पिकांनाबगल देत शेतकरी हळद लागवडीकडे सर्वाधिक जास्त वळले आहेत. काही शेतकरी तर दोन ते तीन क्विंटल हळदीची लागवड करुन पुढील वर्षीचा अंदाज घेत आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हळद लागवडीसाठी बेण्याचाही शोध घेत आहेत.सध्या हिंगोली येथील कृउबामध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, हळद पाहून ८ ते ९ हजारापर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
मोंढ्यात वाढली शेतीमालाची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:47 AM